महापालिका कर्मचाऱ्यांना अडीअडचणी सोडवू – अंबर चिंचवडे

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असून, जाहीरनाम्यात दिलेली वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यरत राहणार आहे,’’ अशी ग्वाही पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी दिली.
कर्मचारी महासंघाची निवडणूक सुमारे पंधरा वर्षांनंतर झाली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत अंबर चिंचवडे अध्यक्ष असलेल्या आपला महासंघ पॅनेलने शंकर
गावडे कर्मचारी महासंघ पॅनेलचा धुव्वा उडविला.
आपला महासंघ पॅनेलच्या पदाधिकाऱ्यांची नावे – अभिमान भोसले (उपाध्यक्ष), सुप्रिया सुरगुडे (सरचिटणीस), योगेश रसाळ (चिटणीस), बाळासाहेब कापसे (सहसचिव), अविनाश ढमाले (कोषापाल), धनाजी नखाते (संघटक), गोरख भालेकर (प्रमुख संघटक). या व्यतिरिक्त तेरा जणांची कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे. यात सुरेश गारगोटे, विलास नखाते, अमित जाधव, नवनाथ शिंदे, बाळू साठे, अनिल राऊत, धनेश्वर थोरवे, अविनाश तिकोने, रणजित भोसले, सुभाष लांडे, मिलिंद काटे, शुभांगी चव्हाण, योगेश वंजारे यांचा समावेश आहे.





