ऋषी कपूरना सून म्हणून हवी आलिया
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/alia-bhatt-pic.jpg)
बॉलिवूडमधील “कास्टिंग काऊच’बाबत बऱ्याच सेलिब्रिटींनी आपापले म्हणणे मांडले आहे. आघाडीची नायिका म्हणून आलिया भटनेही या विषयावरच्या चर्चेत सहभाग घेतला आहे. “कास्टिंग काऊच’ फिल्म इंडस्ट्रीमध्ये असल्यास ते ताबडतोब बंद व्हायला पाहिजे. ज्यांना “कास्टिंग काऊच’मुळे फायदा झाला झाला, त्यांच्याचमुळे ही कुप्रथा सुरू झाली आहे. जर कोणी या जाळ्यात अडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यामध्ये अडकायचे की नाही याचा निर्णय तरी स्वतःला घेता येऊ शकतो. आपल्या पालकांच्या मदतीने संबंधित व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे, अशी सूचनाच अलियाने नवोदित अभिनेत्रींना दिली आहे. तिच्या या विचारांचे कौतुक खुद्द तिचे पप्पा महेश भट यांनीही केले आहे. या सडेतोड आणि ठाम वक्तव्यावरून त्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
आलिया भटच्या “राजी’चे आणि त्यातल्या तिच्या कामाचे खूप कौतुक होते आहे. आलिया सध्या या सिनेमाचे यश एन्जॉय करते आहे. अलियाचा अभिनय आणि तिच्या या सडेतोड विचारांचे कौतुक तर ऋषी कपूर यांनाही वाटू लागले आहे. आलिया आणि रणबीर कपूरच्या अफेअरच्या चर्चांनाही आता उधाण यायला लागले आहे. करण जोहरच्या कॉफी शो मध्ये अलियाने रणबीर हाच आपला पहिला क्रश असल्याचे मान्य केले होते. सोनम कपूरच्या लग्नातही ते दोघे एकत्र होते. हे दोघेजण आता “ब्रम्हास्त्र’ या आगामी सिनेमातही एकत्र असणार आहेत. आलियाने ऋषी कपूर यांच्याबरोबर “कपूर ऍन्ड सन्स’मध्येही काम केले आहे. आपण भट कुटुंबातील सर्वांबरोबर काम केले आहे. त्या सर्वांबरोबरच्या कामाचा अनुभव खूप छान होता. असे म्हणून ऋषी कपूरनी भट फॅमिलीला धन्यवाद दिले आहेत. त्यावर अलियाने आपले नाते रणबीरशी जोडले जात असल्याचे सांगितले.
त्यावर ऋषी कपूर यांनी “खूप छान, आपण पुन्हा एकत्र येऊ.’ असा रिप्लाय दिला. याचा अर्थ अलिया आणि रणबीरच्या रिअल लाईफ जोडीला ऋषी कपूर यांचा हिरवा कंदिल आहे आणि अलिया ही कपूर खानदानाची बहू व्हावी, असेच त्यांना वाटते आहे.