breaking-newsपिंपरी / चिंचवड
पवनाथडी जत्रेतील स्टॉलसाठी अर्ज उपलब्ध, जनसंपर्क कार्यालयात संपर्क करण्याचे नगरसेविका आश्विनी चिंचवडे यांचे आवाहन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/pcmc-main.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे राबविण्यात येणा-या पवनाथडी जत्रेतील स्टॉलसाठी आपल्या जनसंपर्क कार्यालयात अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेची माहिती नगरसेविका आश्विनी गजानन चिंचवडे यांनी कळविली आहे.
महापालिकेच्या वतीने फेब्रुवारीमध्ये पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. त्यामध्ये शहरातील महिला बचत गटांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. मात्र, पालिकेत अर्ज करण्याची प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ असल्याने आपल्या जनसंपर्क कार्यालयात अर्ज उपलब्ध करून देण्यात आल्याचे चिंचवडे यांनी सांगितले. तरी, इच्छुक बचत गटांच्या महिला प्रमुखांनी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेविक आश्विनी चिंचवडे यांनी केले आहे.