पुणे मेट्रोची पहिली चाचणी यशस्वी
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगर ते पुढे सव्वा किलोमीटर एवढे अंतर शुक्रवारी (दि.10) घेण्यात आले. त्यात मेट्रोची पहिली चाचणी यशस्वी ठरला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगर येथे मेट्रोचा पहिला खांब उभारण्यात आला होता. त्यानंतर मेट्रोच्या दोन्ही ट्रेनही तुकाराम नगर येथेच आणण्यात आल्या. 31 डिसेंबर रोजी पहिली ट्रेन रुळावर चढविण्यात आली होती. मेट्रोची इलेक्ट्रिक चाचणी घेण्याची सर्व प्रक्रिया व परवानग्या घेण्याची तयारी मेट्रो प्रशासनाने सुरू केली होती.
या परवानग्या मिळाल्यानंतर शुक्रवारी दुपारी इलेक्ट्रिक केबलद्वारे वीज प्रवाह उपलब्ध करण्यात आला. त्यानंतर तुकाराम नगरपासून पुढे 1.2 किलोमीटरची पहिली चाचणी घेण्यात आली. तर पुन्हा तुकाराम नगरच्या दिशेने मेट्रोची चाचणी घेण्यात आली. एकूण 2.4 किलो मीटरदरम्यान जाताना आणि येताना मेट्रोला कोणताच अडथळा आला नाही.