Breaking-newsताज्या घडामोडी
महाराष्ट्रातील पाच आमदारांवर जम्मूत दहशतवादी हल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/five-mlas-maharashtra-escaped-terrorist-attacks-.jpg)
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेलेले महाराष्ट्रातील पाच आमदार आज दहशतवाद्यांनी हल्ला केला. दरम्यान, या हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत. बचावलेल्या आमदारांमध्ये विक्रम काळे यांच्यासह तुकाराम काते, किशोरआप्पा पाटील, सुधीर पारवे, दीपक चव्हाण या आमदारांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील हे आमदार पंचायत राज समितीच्या कामासाठी काश्मीर दौऱ्यावर गेले होते. हे आमदार अनंतनाग जिल्ह्यातून प्रवास करत असताना त्यांच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, तसेच ग्रेनेड फेकले. मात्र या आमदारांच्या वाहन चालकाने आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी प्रसंगावधान दाखवत सर्वांना घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी नेले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.