छपाकच्या यशासाठी दिपिका बाप्पाच्या चरणी…
अभिनेत्री दीपिका पादुकोन ही ‘छपाक’ चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. २०२० मधला प्रदर्शित होणारा ‘छपाक’ हा दीपिकाचा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट आज देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या यशासाठी दीपिकानं मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाच दर्शन घेतलं आहे.
दीपिकानं सिद्धिविनायकाच्या चरणी माथा टेकवत ‘छपाक’ च्या यशासाठी प्रार्थना केली. तसेच निर्मिती क्षेत्रातील वाटचालीसाठी बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यापूर्वी अनेकदा दीपिका मंदिरात दर्शनासाठी आली आहे.
२०१८ साली ‘पद्मावत’ प्रदर्शित झाल्यानंतर दीपिका २०१९ या वर्षांत कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. साधरण दीड वर्षे ती रुपेरी पडद्यापासून लांब होती. तिनं ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली. मात्र एका चाकोरीत न अडकता नव्या वर्षांची सुरुवात दीपिकानं एका धाडसी निर्णयानं केली.