व्हेनेझुएला अध्यक्षीय निवडणुकीत मादुरो यांची सरशी
कच्च्या तेलाच्या व्यापारावर अवलंबून असलेल्या व्हेनेझुएलाला सुमारे 3 वर्षांपासून आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. या संकटापासून बचावाकरता हजारोंच्या संख्येत लोकांनी शेजारी देशात आश्रय घेतला आहे. व्हेनेझुएलात एक बेड हजारो रुपयांमध्ये तर लाखो रुपयांच्या दरात मांस मिळत आहे. अशा आर्थिक संकटाच्या स्थितीत विरोधक सातत्याने मादुरो यांना सत्तेवरून हटवण्याची मागणी करत आहेत.
अध्यक्षीय निवडणूक प्रारंभापासून वादग्रस्त राहिली आहे. यंदाच्या निवडणुकीत केवळ 46 टक्के मतदान झाले. यादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार आणि व्यापक निदर्शने देखील झाली असून यात 10 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. या अगोदर कधीच अध्यक्षीय उमेदवाराला 68 टक्के मते मिळाली नव्हती, असे मादुरा यांनी म्हटले. अधिकृत निकालानुसार मादुरो यांना 67.7 टक्के मते मिळाली आहेत. तर मुख्य विरोधी उमेदवार फाल्कन यांना 21.2 टक्के मतेच मिळू शकली. तिसऱया स्थानावर राहिलेले ख्रिश्चन धर्माचे प्रचारक जेव्हियर बटरुची यांना 11 टक्के मते प्राप्त झाली. त्यांनी देखील नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली. मादुरो 2013 मध्ये पहिल्यांदा अध्यक्ष झाले होते.