मी नाराज नाही, पक्षाचे काम करत राहणार; उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतरचे सत्तारांचे स्पष्टीकरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/abdul-sattar-shivsena.jpg)
मुंबई | महाईन्यूज
शनिवारी औरंगाबादेत रंगलेल्या नाराजीनाट्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. मातोश्रीवर सुमारे 20 मिनिटे चाललेल्या या भेटीत सत्तार यांची नाराजी, पक्षांतर्गत वाद, गटबाजीवर सर्विस्तर चर्चा झाली आहे. तसेच आपल्या राजीनाम्याची अफवा कुणी पसरवली याबाबतची माहिती आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली, असे सत्तार यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. तसेच सोमवारी संध्याकाळी पाच वाजत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहितीही सत्तार यांनी दिली आहे.
गेल्या आठवडाभरापासून नवनियुक्त मंत्र्यांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर आज सकाळी जाहीर झालेले आहे. दरम्यान,खातेवाटपामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराज आमदार अब्दुल सत्तार यांच्या पारड्यात महत्त्वाची खाती टाकलेली आहे. राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झालेल्या सत्तार यांच्याकडे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य या खात्यांची जबाबदारी असणार आहे.