Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

अमेरिकेकडून पुन्हा इराकवर हवाई हल्ला, 6 जणांचा मृत्यू तर ३ जन गंभीर

Share On

बगदाद | महाईन्यूज

अमेरिकेकडून पुन्हा इराकवर हवाई हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झालेले आहेत. शनिवारी उत्तरी बगदादमध्ये हा हल्ला करण्यात आला असून जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

माहितीनुसार, अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या हवाई हल्ल्यात इराण समर्थक मिलिशिया हश्द अल शाबीच्या काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. हश्द अल शाबी हा इराण समर्थक प्रसिद्ध मोबलाइजेशन फोर्सेसचे दुसरे नाव आहे. बगदादमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात दोन वाहनांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे या वाहनातून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जळून मृत्यू झालेला आहे. या हल्ल्यात हश्द अल शाबीच्या एका मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button