breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
नव वर्षाची नव्यानं सुरुवात करून, नागरिकांची ‘साईबाबा’ अन् ‘बाप्पांचा’ आशीर्वादाची ओढ
मुंबई | महाईन्यूज
एकीकडे पार्ट्या करुन निवांत झोपलेले दिसतात, तर दुसरीकडे पहाटेपासूनच देवाच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी रांगेत उभारलेले दिसतात. शिर्डीतील साई मंदिरात आणि मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. नव वर्षाची सुरुवात, घेऊन बाप्पांचा आशीर्वाद असंच चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे देवदर्शनासाठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गर्दी होणार म्हणून मंदिर ट्रस्टनेही विशेष काळजी घेतली आहे. देशभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत होत आहे, त्यात धार्मिक भावही दिसून येत आहे. सोशल मीडियाही शुभेच्छांनी भिजून गेल्याचं पाहायला मिळत आहे. शिर्डी, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूरसह आप-आपल्या ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत भाविकांकडून नवीन वर्षाची सुरुवात करण्यात येत आहे.