![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/new-15.png)
मुंबई |महाईन्यूज |ऑनलाईन टीम|
टीव्ही अभिनेता अक्षय वाघमारे याचा नुकताच साखरपुडा झाला. ‘डॅडी’ म्हणजेच कुख्यात गँगस्टर अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळीसोबत अक्षचा साखरपुडा झाला. अक्षय आणि योगिता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत अक्षय-योगिताचा साखरपुडा झाला.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Akshay-Waghmare-Engagement-Yogita-Gawali.jpg)
‘मी योगिताला गेल्या पाच वर्षांपासून ओळखतो. आमच्या कुटुंबीयांनी आम्हाला विवाहबंधनात अडकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघंही आनंदी आहोत’ असं अक्षय वाघमारेने एका वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत सांगीतल आहे.
योगिता आणि अक्षयच्या साखरपुडा समारंभाला अभिनेता क्षितीज दाते, मुग्धा परांजपे, विभावरी देशपांडे, हृषिकेश देशपांडे यासारख्या कलाकारांनी हजेरी लावली होती. योगिता आणि अक्षय फेब्रुवारी 2020 मध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत.