breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
”शॉर्ट सर्कीट” झाल्यामुळे काळेवाडीत धावत्या कारने घेतला पेट
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथे भरदिवसा कारने पेट घेतला. ही कार काळेवाडी येथून पिंपरीकडे निघाली होती. आज रविवारी (दि. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, ळेवाडीकडून पिंपरीच्या दिशेने येत असलेल्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास काळेवाडी येथील डी मार्टजवळ घडली. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच रहाटणी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल करण्यात आला आहे. आग आटोक्यात आली आहे