breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे-मुंबई महामार्गावर अग्नितांडव, दोन गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी

लोणावळा | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुणे- मुंबई राष्ट्रीय द्रुतगती महामार्गावर आज गुरूवारी (दि. 19) पहाटे दोन वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या. त्यात दोन मोटारी जळून अक्षरशः खाक झाल्या आहेत. या दोन्ही दुर्घटनांमध्ये कोणालाही हानी पोहोचलेली नाही. काही प्रमाणात वाहतुकीला अडथळा मात्र निर्माण झाला. वेळीच पोलिसांनी सतर्कता दाखविल्याने वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळाले.

महामार्गावरील पहिली दुर्घटना अमृतांजन पुलाजवळ किमी नं 45/600 याठिकाणी घडली. तर, दुसरी घटना खोपोली हद्दीत ढेकू गावाजवळ घडली. पहिल्या घटनेत ट्रकच्या (एमएच-46- अेआर-5135) इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन पेट घेतल्याने केबिन व बोनेट जळाले आहे. लोणावळा शहर पोलीस व रस्ते विकास महामंडळाच्या पथकाने आगीवर कसेबसे नियंत्रण मिळवून वाहतुकीवर कसलाही परिणाम पडणार यासाठी वेळीच सतर्कता दाखविली. दुस-या दुर्घटनेत खोपोलीतील ढेकू गावाजवळ एक टँकर रस्त्याच्या कडेवरून खाली पडल्याने त्याला आग लागली. ही आग भयंकर होती. सर्वत्र धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा पहायला मिळत होत्या. पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

घटनेची माहिती कळताच देवदुत, डेल्टाफोर्स, आयआरबी पेट्रोलिगं, बोरघाट पोलीस, हायवे पोलीस, लोकमान्य हॉस्पिटल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम, हायवे पोलीस यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. तत्काळ आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हाणी नाही. कोणालाही दुखापत नाही, अशी माहिती पोलिसांनी सांगितली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button