स्थायी समितीकडून ठेकेदार पोसण्यासाठी भरीव मदत
वायसीएमच्या वाहनतळासाठी पावणे आठ कोटीचा वाढीव खर्च
पिंपरी |महाईन्यूज|
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासमोर अतिरिक्त वाढीव पार्किंग करण्यास स्थायी समितीने आज (बुधवार) ठेकेदाराला भरीव वाढीव मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडिगेरी होते.
संत तुकारामनगर येथील वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले. या रुग्णालयात नवजात अर्भक विभाग नुतनीकरण करणे, डाक्टर निवासस्थानाचे नुतनीकरण करणे दोन फेजचे कामातंर्गत अतिरिक्त वाहनतळ उभारण्यात येत आहे. सदर कामाची मूळ निविदा 30 कोटी 66 लाख 71 हजार 616 रुपये यास मे. एस.एस.साठे यांना काम करण्यास मान्यता दिलेली आहे.
या कामासाठी जागेची खोदाई झालेली आहे. त्यामुळे अतिरिक्त वाढीव पार्किंग करणे शक्य आहे. सदर पार्किंगमुळे वायसीएमएच पार्किंगची समस्या नागरिकांना सोयी व सुरक्षिततेच्या दृष्टीने समस्या सुटण्यास मदत होणार आहे. या कामास अतिरिक्त तळघराचे काम संबंधित ठेकेदार मे. एस.एस.साठे हे निविदा मंजुर दराने करण्यास तयार आहेत.
त्यामुळे या कामाने सुधारित वाढीव तळघराच्या कामास 7 कोटी 81 लाख 90 हजार 758 रुपये या रकमेच्या खर्चास ठेकेदारांना निविदा मंजुर करण्यात आली. यात 4.50 टक्के दराने जास्त वाढीव दराने देण्यात आलेली आहे. दरम्यान, जादा दराने वाढीव तरतूद मंजुर करण्यात आल्याने ठेकेदार पोसण्यासाठी करदात्या नागरिकांच्या पैशाचा वापर होवू लागल्याचे दिसत आहे.