breaking-newsपिंपरी / चिंचवड
दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लंपास केले 6 लाखांचे दागिने
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील 6 लाख 11 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारी (दि. 15) सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.
याप्रकरणी सपना सभाजित सिंग (वय 33, रा. सिल्व्हर रॉक्स, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना सिंग शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घऱाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील तब्बल 6 लाख 11 हजार 240 रुपये किंमतीचे 240 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास सपना घरी परतल्यानंतर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.