अजित पवारांची सुट-बुट घालून अधिवेशनाला जोरदार एंट्री…

नागपूर | महाईन्यूज
हिवाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. त्यामुळे संसदीय कामकाजासाठी नव्याने आलेल्या आमदारांनी पहिल्यांदाच विधानसभेत येत असल्याचा आनंद व्यक्त केला. हिवाळी अधिवेशन असल्याने नागपूरात चांगलीच थंडी पडली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकला. तर, पहिल्याचदिवशी सावराकरांवरील विधानावरुन सरकारला लक्ष्य केलं. यंदाच्या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एंट्री लक्षणीय ठरलेली आहे.
आपल्या नेहमीच्या पेहरावात न येता, नागपूर विधिमंडळात अजित पवार यांची एंट्री जोधपुरी सुट-बुट परिधान करुन झाली आहे. अजित पवारांचा हा लूक पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं, तशी चर्चाही अधिवनेशाच्या ठिकाणी सुरू झाली. याबाबत अजित पवारांना विचारलं असता, त्यांनीच आपल्या पोशाखावर स्पष्टीकरण दिलं. ”सध्या मोठा गारठा सुटलाय, जरा व्यवस्थित राहावं म्हणून जाड कपडे घातले,” असं अजित पवार यांनी सांगितलं. यापूर्वी आपल्या एका भाषणात अजित पवारांनी सुटा-बुटात येणाऱ्या सहकारी आमदाराला टोला लगावला होता. तसेच, मी राज्याचा उपमुख्यमंत्री असताना सुट-बुट घालत होतो, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर, बऱ्याच दिवसांनी अजित पवारांचा हा जोधपुरी ड्रेस परिधान केलेला लूक कार्यकर्त्यांना पाहायला मिळाला आहे.





