breaking-newsपिंपरी / चिंचवड
श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवातील रक्तदान शिबीरात १८६ जणांचा प्रतिसाद
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
चिंचवड येथील श्री मोरया गोसावी समाधी महोत्सवात रविवारी (दि. 15) रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये १८६ जणांनी ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ असा संकल्प केला.
पुण्यातील ओम ब्लड बँकेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन ॲड. सुनिल आवारे यांनी केले. या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, नगरसेवक सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, राजू गावडे, मुख्य संयोजक राजू शिवतरे उपस्थित होते.
सर्वात पहिले रक्तदान भूमकर चौक, वाकड येथील गणेश तेली या अपंग व्यक्तीने करून या सामाजिक कार्याचा आदर्श घालून दिला. तेली यांचा सत्कार देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रृती शिंदे, उमेश इनामदार, राजेश ढावरे उपस्थित होते.