Breaking-newsमनोरंजन
एका ‘सनी’ने मागितली दुसऱ्या ‘सनी’ची माफी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/sunny-sunny-frame-copy.jpg)
- म्हणून सनी लिओनीने मागितली सनी देओलची माफी
अलिकडेच ‘आंतरराष्ट्रीय भोजपुरी चित्रपट पुरस्कार’ सोहळा सिंगापूर येथे पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक नामवंत बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान सनी लिओनीला पुरस्कार प्रदान करण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रण दिले गेले. त्यावेळी तिने सनी देओलची माफी मागितली. ती म्हणाली, “सनी कृपया मला माफ करा. माझे आणि तुमचे नाव सारखेच आहे, त्यामुळे अनेकदा माझ्यामुळे तुमच्यावर ट्रोल होण्याची वेळ येते. अनेकदा नेटकरी सनी या नावाने मीम्स व्हायरल करतात. ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो. याबद्दल कृपया मला माफ करा” अशा शब्दात तिने माफी मागितली.
सनीने माफी मागितल्यानंतर सर्वांचे लक्ष आता दुसऱ्या सनीच्या दिशेने गेले. परंतु त्याने काहीही न बोलता केवळ हसून प्रतिक्रिया दिली. हा गंमतीदार प्रसंग पाहून सभागृहातील सर्व प्रेक्षकांनी एकच हास्यकल्लोळ केला.