Breaking-newsराष्ट्रिय

झारखंड: मतदानादरम्यान गोळीबार; एकाचा मृत्यू

महाईन्यूज | झारखंड

झारखंडमध्ये विधानसभेच्या २० जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात जाली आहे. २० जागांसाठी तब्बल २६० उमेदवार रिंगणात उतरले आहे. सर्वच मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. ४२ हजार जवान दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी तैनात करण्यात आले आहेत. अशातच नक्षलग्रस्त भागांमध्येही मोठ्या प्रमाणात जवान तैनात करण्यात आलेले आहेत. अशातच एका मतदान केंद्रावर अचानक गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर आली आहे.

गुमला जिल्ह्यातील सिसई विधानसभा क्षेत्रातील एका मतदान केंद्रावर पोलीस आणि मतदारांमध्ये वाद झाले. यानंतर या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यादरम्यान पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका गावकऱ्याच्या मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. याव्यतिरिक्त या घटनेत एक पोलीस अधिकारी आणि एक पत्रकारही जखमी झाला आहे. सर्वांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button