देहूरोड येथे तरुणीचा विनयभंग, दोन तरुणांना झाली अटक

देहूरोड येथे तरुणीचा विनयभंग, दोन तरुणांना झाली अटक

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

दुकान बंद करत असताना तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 3) रात्री दहाच्या सुमारास देहूरोड येथील पंडीतचाळीत घडला.

संगमेश्वर शरणप्पा कुर्हाडे (वय 20) आणि उमेश शरणप्पा कुर्हाडे (वय 20, दोघे रा. शिवाजी विद्यालयाच्या मागे, पंडीत चाळ, देहूरोड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 3) रात्री दहाच्या सुमारास तरुणी आपले गोळ्याबिस्कीटाचे दुकान बंद करून घरी निघायच्या तयारीत होती. दुकान बंद करत असताना वस्तीत राहणारा उमेश (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) त्याठिकाणी आला. त्याने तरुणीकडे ‘’पाहून ये लैला… ऐ लैला…’’ म्हणून हिनवले. त्याचा भाऊ संघ्या (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) त्याठिकाणी आला. त्याने तरुणीला शिवीगाळ केली. दमदाटी केली. त्यावर तरुणीने ‘’पोलीस तक्रार’’ देण्याची भीती दाखविली. त्यावर उमेश म्हणाला की ‘’जा मेरी तक्रार कर किसको बुलाना है बुला ले’’, असे म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी दोघांनाही अटक केली आहे. देहूरोड पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *