breaking-newsराष्ट्रिय
भाजपच्या घशात हात घालून कॉंग्रेसने सत्ता बाहेर काढली – राज ठाकरेंचे ‘फटकारे’
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये जनता दल सेक्यूलर आणि काँग्रेस युतीने भाजपला दणका दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपला फटकारले आहे. काँग्रेसनं भाजपच्या घशातून सत्ता बाहेर काढली, अशा आशयाचं व्यंगचित्र रेखाटून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर- काँग्रेस सरकारचा शपथविधी बुधवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकमधील घडामोडींवर व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रात राज ठाकरे यांनी काँग्रेस, कुमार स्वामी आणि अमित शहा या तिघांना दाखवले आहे. काँग्रेसने भाजपाच्या घशात हात घालून सत्ता बाहेर काढली, असा जोरदार चिमटा राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून काढला आहे.