Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
विधानभवनात नवनिर्वाचित 288 आमदारांचा शपथविधी सोहळा

मुंबई : विधानभवनात आज नवनियुक्त 288 आमदार विधानसभेच्या सदस्यपदाची शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. विधानसभेचं एक दिवसाचं विशेष अधिवेशन आज (बुधवार 27 नोव्हेंबर) बोलावण्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेले ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देण्यात येणार आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून शपथविधी सुरु झाला आहे.




