Breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड भाजप कार्यालयात संविधान दिन साजरा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने आज संविधान दिन उत्साहात करण्यात आला. यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ अध्यक्ष अमित गोरखे, उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, अनुराधा गोरखे, राजू दुर्गे, राजेश पिल्ले, जयश्री वाघमारे, शैला मोळक, सरचिटणीस रविजी केळकर, अनुसूचित जाती अध्यक्ष मनोज तोरडमल, कोमल शिंदे, दीपक चखाले, राजू आवळे आदी यावेळी उपस्थित होते.

अमित गोरखे म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने सर्वश्रेष्ठ संविधान  २६ नोव्हेंबर १९५० रोजी घटना समितीने स्वीकारले. भारतीय इतिहासातील २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताचे संविधान किंवा राज्य घटना हे भारत देशाचे संविधान हे पायाभूत कायदा आहे. भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. संविधानातील तत्वे आपणा सर्वांसाठी आदर्श आहेत. याचे पालन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमल शिंदे यांनी केले. तसेच, आपले मनोगत उपमहापौर तुषार हिंगे, माऊली थोरात, मनोज तोरडमल, राजेश पिल्ले यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button