आम्ही भाजपला पुरून उरू – संजय राऊत
मुंबई | ठरल्याप्रमाणे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत संजय राऊतांनी दावा केला आहे की, भाजपपेक्षा आमचा आकडा मोठा असून दहा आमदार आमच्याकडे जास्त आहेत. आम्ही भाजपला पुरून उरू असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
पुन्हा एकदा संजय राऊतांची पत्रकार परिषद गाजली आहे. अनेक प्रश्नांचा खुलासा संजय राऊत यांनी केली आहे. तसेच बहुमताचा संपूर्ण आकडा असलेले कागदपत्र आमच्याकडे आहेत. त्यामुळे आमचंच सरकार स्थापन होईल असा विश्वास संजय राऊतांनी स्पष्ट केला आहे. तसेच या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी आमदारांना हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याचं देखील त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे आणखी 3 आमदार पुन्हा शरद पवारांकडे आले आहेत. यामध्ये दौलत दरोडा, अनिल भाईदास पाटील, नरहरी जिरवळ यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्यासोबत केवळ एकच आमदार आहे. पिंपरी चिंचवडचे अण्णा बनसोडे हे आमदार अजित पवारांसोबतच आहेत.