दोन्ही हातात तलवार घेऊन स्मृती इराणी यांचा डान्स
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/smriti-irani1.jpg)
गांधीनगर : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात . कधी सोशल मीडियावरील त्यांच्या गमतीशीर पोस्टमुळे तर कधी त्यांच्या कामांमुळे त्या चर्चेचा विषय ठरतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. या व्हिडीओमध्ये स्मृती इराणी या दोन्ही हातांमध्ये तलवार घेऊन नृत्य करताना दिसत आहेत भाजपच्या एका कार्यकर्त्याने त्यांचा हा व्हिडीओ ट्विट केला.
गुजरातच्या भावनगरमध्ये स्वामी नारायण गुरुकूल येथे मूर्ती स्थापना महोत्सव सुरु आहे. या दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हातात तलवार घेत तलवार नृत्य केलं. या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ भाजप कार्यकर्त्याने ट्विट केला. यामध्ये स्मृती इराणी काही विद्यार्थिनींसोबत तलवार नृत्य करताना दिसत आहेत.
स्मृती इराणी यांनी ‘लक्ष्य’ या सिनेमातील ‘कंधों से मिलते हैं कंधें, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं’ या गाण्यावर हे तलवार नृत्य केलं.