महेश बाबूच्या मुलीचं लवकरच कलाविश्वात पदार्पण
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू व नम्रता शिरोडकर यांची सात वर्षांची मुलगी सितारा लवकरच कलाविश्वात पदार्पण करणार आहे. ‘फ्रोझन २’च्या तेलुगू व्हर्जनमधील लहानपणीच्या एल्साला सितारा तिचा आवाज देणार आहे. २०१३ मध्ये ‘फ्रोझन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेल्या या चित्रपटाचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने सिताराच्या पदार्पणाची माहिती दिली असून ‘फ्रोझन २’ हा इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात सिताराची आई नम्रता म्हणाली, ”सिताराला ‘फ्रोझन’ हा चित्रपट फार आवडतो आणि त्यातील एल्सा ही भूमिका तिच्या फार जवळची आहे. तिला चित्रपटांची खूप आवड आहे. त्यामुळे एल्साला आवाज देण्याची संधी ती नाकारुच शकत नव्हती. ही संधी सिताराला देण्याबद्दल मी डिस्नेच्या टीमचे आभार मानते.”
#BreakingNews: Mahesh Babu and Namrata’s 7-year-old daughter Sitara Ghattamaneni to do voice over for young Elsa in the dubbed #Telugu version of #Frozen2… 22 Nov 2019 release in #English, #Hindi, #Tamil and #Telugu.