लहापणी ‘असा’ दिसायचा विकी कौशल
मुंबई – ‘उरी – द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असतो. तो नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ त्यांच्यासोबत लाइफ इव्हेंट तो शेअर करत असतो. त्यांचे विविध अंदाजातील आणि चित्रपटाच्या संबंधीत असलेले फोटो तो यावर पोस्ट करत असतो. त्याच्या सगळ्याच फोटोंना त्यांच्या फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो. मात्र यावेळी त्यांनी कुठल्याही चित्रपट किंवा आताचे फोटो इन्टाग्रामवर न शेअर करता बालपणातील फोटो शेअर केला आहे.
इन्टाग्रामवर शेअर केलेल्या लहानपणीचा फोटोत तो खूपच क्यूट दिसत होता. या फोटोला त्याने फ्रीज पोटॅटो कॅप्शन दिले आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या फोटोला त्याच्या फॅन्सची खूपच चांगली पसंती मिळत आहे. या फोटोला त्यांच्या फॅन्सकडून हटके अंदाजात कमेंट येत आहे.