Breaking-newsपुणे

राज ठाकरेंच्या सभांचा करिष्मा आणि पक्षबांधणीवर धावणार मनसेचं इंजिन

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पुण्यातील विधानसभेच्या आठपैकी पाच जागा लढविण्यात येत आहेत. पक्षाला मागील काही निवडणुकांमध्ये आलेल्या अपयशानंतर पक्षबांधणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. मागील दोन-अडीच वर्षात बांधलेली पक्ष संघटना, कार्यकर्त्यांचे जाळे आणि स्थानिक पातळीवर नागरिकांची केलेली कामे यामुळे निवडणुकीमध्ये चांगला फायदा होईल, असे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.


मनसेचे एकेकाळी पुण्यात 29 नगरसेवक निवडून आले होते. परंतू, ही संख्या एकदम दोनवर आली. तरीही पक्ष नेते आणि कार्यकर्ते निराश होऊन बसले नाहीत. सातत्याने पक्षबांधणीवर भर देण्यात आला. त्यासाठी शाखा स्तरापासून विभागापर्यंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची फळी निर्माण करण्यात आली. संपर्काचे जाळे निर्माण करण्यात आले. शहरप्रमुख म्हणून मोठी जबाबदारी आहे. पक्ष वाढीसाठी एक मतदार संघ आठवड्याचा एक दिवस याप्रमाणे नियोजन केले होते. त्यातूनही स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा जनसंपर्क वाढला. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group