breaking-newsमनोरंजन

रेखा यांच्या आवाजात ऐका गली बॉयचा डायलॉग

बॉलिवूडमधील सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे आयफा आवर्ड. यंदा आयफा अवॉर्डचे विसावे वर्ष आहे आणि २०१९ चा हा पुरस्कार सोहळा काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये पार पडला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी ग्लॅमरस आणि हटके लूकमध्ये या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. दरम्यान सर्वात जास्त चर्चा रंगल्या त्या बॉलिवूडमधील जेष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या. सध्या रेखा यांचा पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओचे केनेक्शन थेट बॉलिवूडची क्यूट गर्ल आलिया भट्टशी आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रेखा ‘गली बॉय’ चित्रपटातील ‘मेरे बॉयफ्रेंडसे गुलूगुलू केरेगी तो…’ डायलॉग आलियाच्या अंदाजात बोलताना दिसत आहेत. दरम्यान रेखा यांनी काढलेला आवाज हुबेहुब आलियासारखा वाटत आहे. तो ऐकून सर्वच कलाकारांनी रेखा यांची व्हाह व्हाह केली आहे.

https://www.instagram.com/viralbhayani/?utm_source=ig_embed

आयफा अवॉर्डमध्ये रेखा यांच्या हस्ते आलियाला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यासाठी स्टेटवर बोलवण्यात आले होते. त्यावेळी घडलेला हा किस्सा सध्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरला आहे. लवकरच आयफा अवॉर्ड कलर्स वाहिनीवर प्रदर्शित होणार आहेत. या अवॉर्डच्या प्रोमोमध्ये रेखा यांच्या अनोख्या अंदाजातील डायलॉग ऐकायला मिळत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button