पुणेमहाराष्ट्र
मत्स्य उत्पादनात “महा’भरारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/09/fishery-696x440.jpg)
पुणे – राज्यात गोड्या आणि समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. सन 2011-12 मध्ये राज्यात गोड्या आणि समुद्राच्या पाण्यातील मत्स्य उत्पादन 5 लाख 79 हजार टन होते. यंदा यात 27 हजार टनांची वाढ झाली आहे. तर, एकूणच सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र देशात चौथ्या स्थानावर आहे.
महाराष्ट्राचा निधीही वाढवला
2010-11 पासून आतापर्यंत महाराष्ट्राला मत्स्य क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून एकूण 128 कोटी 86 लाख 81 हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. सन 2010-11 मध्ये राज्याला 7 कोटी 17 लाख 63 हजारांचा निधी वितरित करण्यात आला होता. यात वाढ होऊन आतापर्यंत 22 कोटी 56 लाख 81 हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा वाढविण्यास मदत होत आहे.