Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लष्कर हद्दीतील पाणी लोकवस्तीत शिरल्याने पिंपळे सौदागरमधील जनजीवन विस्कळीत

  • पिंपळे सौदागरमध्ये लष्कर हद्दीवर सुरक्षाभिंत बांधण्यात यावी
  • राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांची आयुक्तांकडे मागणी  

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपळे सौदागर येथील लष्कराच्या हद्दीतील पावसाचे पाणी काटे झिंजुर्डे मळा येथील लोकवस्तीकडे जाणा-या रस्त्यावर येत असल्यामुळे वाहनचालकांसह पादचा-यांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. लष्कराच्या हद्दीतून येणारे पावसाचे पाणी रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी लष्कर प्रशासनासोबत समन्वय साधून याठिकाणी सुरक्षाभिंत बांधावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांनी केली आहे.

यासंदर्भात संदीप काटे यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपळे सौदागर येथील काटे झिंजुर्डे मळा आणि लष्कराची हद्द एकमेकांना लागून आहे. सुमारे एक हजार घरांची ही लोकवस्ती आहे. सध्या पावसाचा जोर वाढल्यामुळे लष्कराच्या हद्दीतील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्तीत येत आहे. 200 एकर डिफेन्स लँडचा लोकवस्तीकडे उतार असल्यामुळे हे पाणी नागरिकांच्या घरासमोर, रस्त्यावर जमा होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना पायी चालत जाणे अशक्य झाले आहे. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढत जावे लागत आहे. या पाण्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

लष्करासोबत समन्वय साधून आयुक्तांनी मार्ग काढावा

या भागातील लष्कराची हद्द निश्चित केलेली आहे. पाठीमागे लष्करासोबत चर्चा करून हद्दीवर सुरक्षाभींत बांधण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतला होता. मात्र, काही कारणास्तव तो रखडला आहे. या भागातील जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी लष्कर प्रशासनासोबत समन्वय साधून याठिकाणी सुरक्षाभिंत बांधावी. त्यामुळे लष्कर हद्दीतील पावसाचे पाणी लोकवस्तीत येणार नाही. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरीक आणि लहान मुलांना त्याचा त्रास होणार नाही, अशी मागणी युवा कार्यकर्ते काटे यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button