breaking-newsराष्ट्रिय
कॉंग्रेसला धक्का, कर्नाटक विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बोपय्या
कर्नाटक विधानसभेचे हंगामी अध्यक्ष के. जी. बोपय्या यांच्या नियुक्तीला कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले.यावर शनिवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणीला सुरुवात झाली.
कर्नाटक विधानसभेत शनिवारी बहुमत चाचणी होणार आहे. या चाचणीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपाचे नेते के. जी. बोपय्या यांची नियुक्ती केली.
हंगामी अध्यक्ष हा सर्वाधिक काळ आमदारकी भूषविलेला सदस्य असावा, मात्र तरही ही नियुक्ती केली गेल्याने कॉंग्रेसने यालाही सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. कॉंग्रेसचे आर. व्ही. देशपांडे हे आठवेळा आमदार म्हणून निवडले गेले आहेत, तर बोपय्या हे चारवेळाच आमदार झाले आहेत.