पिंपरीत राष्ट्रवादीला धक्का; दत्ता साने करणार लवकरच शिवसेनेत प्रवेश!

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने शिवसेनेच्या वाटेवर दिसत आहेत. लवकरच साने राष्ट्रवादीला रामराम ठोकणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी चक्क राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली आहे. आगामी वर्षात देखील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दत्ता काकांना विरोधी पक्षनेते पदावर राहण्याची अपेक्षा होती. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तशी इच्छा व्यक्त केली होती. त्याची दखल घेतली गेली नसल्यामुळे त्यांनी आता नाराजी व्यक्त करत शिवसेनेची वाट धरल्याचे चित्र दिसत आहे. त्यांनी फेसबुकवर चक्क शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात….





