महापालिका शिक्षण समितीवर नऊ सदस्यांची निवड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/pcmc-2.jpg)
- महापालिका सर्वसाधारण सभेत शिक्षण समिती सदस्याचा सत्कार
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समितीची आज (गुरुवार) सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षीय संख्याबळानूसार नऊ सदस्य निवडण्यात आले आहेत. यामध्ये भाजपकडून सागर गवळी, निर्मला गायकवाड, मनीषा पवार, शशिकांत कदम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर, सुलक्षणा धर, भाऊसाहेब भोईर आणि शिवसेनेच्या रेखा दर्शले यांची निवड झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव आहेत. महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतीसह पहिल्या वर्षातील सदस्यांचा एका वर्षांचा कार्यकाळ 8 जुलै संपुष्टात आला. त्यानंतर महापालिका सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका अशा नऊ सदस्यांची निवड केली आहे.
याकरिता सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी बंद पाकीटातून आपल्या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौरांकडे दिली. त्यानंतर महापौर जाधव यांनी सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. तसेच सर्वांचा महापाैरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच शहर सुधारणा समिती सदस्य आशा शेंडगे आणि रेखा दर्शिले यांनी राजीनामा दिला होता. त्या जागेवर भाजपकडून शर्मिला बाबर तर शिवसेनेच्या सचिन भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.