Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत एका व्यक्तीचा ऑनलाइन मृत्यू नंतर त्यानेच सांगितली पुढची कहाणी

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजची आपण शहानिशा न करता अनेकदा ते मेसेज तसेच पुढे फॉरवर्ड करतो. त्यामुळे एखादी अफवा वेगाने पसरते. काही खोडकर प्रवृत्तीचे लोक माणूस जिवंत असतानाही त्यांच्या निधनाच्या अफवा पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. प्रसिद्ध व्यक्तीमत्वांच्या बाबतीत असे प्रकार सर्रास घडत असतात. दहीसर येथे राहणाऱ्या रवींद्र दुसांगे या ४३ वर्षीय व्यक्तीला रविवारी असाच अनुभव आला. टाइम्स ऑफ इंंडियाने हे वृत्त दिले आहे.

रवींद्र आपल्या कुटुंबासोबत बाहेर असताना त्यांच्या निधनाबद्दल सांत्वन करणारे फोन कॉल येण्यास सुरुवात झाली. रवींद्र यांना त्यांच्या मित्रांनी व्हॉट्स अॅपवर त्यांच्या निधनाचा मेसेज फिरत असल्याची माहिती दिली. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले पण मेसेज आणि फोन कॉल सुरु राहिल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

मागचे तीन दिवस खूप भयानक होते. मी जिवंत आणि व्यवस्थित आहे हे लोकांना सांगून थकलोय. व्हॉट्स अॅपवर अजूनही माझ्या मृत्यूचा मेसेज फिरतोय असे रवींद्र यांनी सांगितले. रविवारी दुसांगे पत्नी आणि आपल्या दोन मुलांना घेऊन मालाड येथील सासू-सासऱ्यांच्या घरी गेले होते. तिथे मोबाइलचे सिग्नल मिळत नाहीत. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास तिथून निघत असताना मी मोबाइलवर मित्रांचे बरेच मिस कॉल पाहिले.

जेव्हा मी त्या फोनला उत्तर दिले. तेव्हा माझ्या मित्रपरिवाराने सुटकेचा निश्वास सोडला. व्हॉट्स अॅपवर माझ्या निधनाचा मेसेज व्हायरल झाल्याची माहिती त्यांनीच मला दिली. कोणीतरी फेसबुकवरुन माझा फोटो काढला त्याखाली श्रद्धांजलीचा मेसेज लिहिला आणि व्हॉट्स अॅपवर तो फोटो पसरवला असे रवीद्रं दुसांगे यांनी सांगितले. अवघ्या दोन दिवसात सांत्वन करण्यासाठी ४०० फोन आले. हा एकप्रकारचा छळच होता. माझ्या आईने हा मेसेज पाहिला तर तिला धक्का बसेल असे त्यांनी सांगितले. दहीसर पोलिसांनी दुसांगे यांची तक्रार नोंदवून घेतली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group