दुर्बल कुटुंबातील तीन मुलींच्या शिक्षणासाठी युवासेनेची धाव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/IMG-20190717-WA0000.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. त्या माध्यमातून पिंपरी विधानसभेतील तीन विद्यार्थिनींच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी युवासेनेने उचलली आहे. या सामाजिक कार्यतून युवासेनेने समाजात ‘बेटी बचाओ, बेटी पडाओ’चा आदर्श घालून दिला आहे.
गुरूपौर्णिमेनिमित्त शिष्यांकडून गुरुंना वंदन केले जात. गुरूदक्षिणा घेतला जातो. परंतु, युवासेनेच्या पदाधिका-यांनी आदर्शवत कामगिरी केली आहे. कासारवाडी येथील रहिवाशी किरण गायकवाड यांना तीन मुली आहेत. मुली दापोडीतील गणेश इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या घरात सहा महिन्यापूर्वी झालेल्या अपघाताच्या घटनेमुळे या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनल्याने त्यांच्यासमोर मुलींच्या शिक्षणाचा यक्ष प्रश्न निर्माण झाला. परिस्थितीतअभावी मुलींचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले होते. परंतु, युवासेनेच्या पदाधिका-यांनी या परिस्थितीचे गांभिर्य विचारात घेऊन गायकवाड कुटुंबियांच्या मदतीसाठी एक पुढे केला.
गायकवाड कुटुंबीयांच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या 3 मुलींचा शिक्षणाचा खर्च युवासेना पिंपरी विधानसभा आणि अनिकेत घुले मित्र परीवार यांनी उचलला. चालू वर्षाच्या शिक्षणाचा धनादेश प्राचार्य घारे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे. यावेळी पिंपरी विधानसभा युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, युवानेते गोपाळ मोरे, युवा शाखाधिकारी ओंकार जगदाळे, ॲड.अजित बोराडे, राहुल राठोड, उपविभाग संघटक सनी कड, रवि नगरकर उपस्थित होते.