Breaking-newsराष्ट्रिय

यमुना एक्स्प्रेस वेवर बस नाल्यात कोसळून २९ जण ठार

उत्तरप्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर सोमवारी सकाळीच अपघात झाला आहे. एक प्रवासी बस नाल्यात कोसळली आहे ज्यामुळे २९ जण ठार झाले आहेत. तर १२ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पोलीस आणि बचाव पथक ठिकाणी पोहचलं असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. ही बस लखनऊ या ठिकाणाहून दिल्लीला जात होती. त्याचवेळी हा अपघात झाला आहे. या बसमध्ये ४७ प्रवासी प्रवास करत होते अशीही माहिती मिळते आहे.

ANI UP

✔@ANINewsUP

#UPDATE 29 persons dead after a bus carrying around 40 passengers fell into ‘jharna nalla’ on Yamuna Expressway in Agra. Rescue operation underway.

70 people are talking about this

ANI UP

✔@ANINewsUP

UP CM Yogi Adityanath has taken cognizance of the accident of Awadh Depot Bus of UP Roadways in Agra on the Yamuna Expressway. He has expressed his grief and condolences at the death of the passengers and directed DM SSP to provide all possible medical attention to the injured.

17 people are talking about this

मृतांच्या नातेवाईकांना उत्तर प्रदेश रोडवेजने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. ही डबल डेकर बस होती, ही बस अवध डेपोची होती. अपघातानंतर या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं असून जखमींना बाहेर काढण्याचे काम केले जाते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group