breaking-newsराष्ट्रिय

हरयाणवी डान्सर सपना चौधरी राजकारणात, भाजपामध्ये केला प्रवेश

हरयाणामधील सुप्रसिद्ध गायिका आणि डान्सर सपना चौधरीने अखेर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाच्या माध्यमातून तिने राजकारणात प्रवेश केला आहे. दिल्लीत भाजपा नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये तिने भाजपामध्ये प्रवेश केला.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये भाजपाची सदस्य नोंदणी मोहीम सुरु आहे. या मोहीमेमध्ये सहभाग घेत सपनाने भाजपाचं सदस्यत्व स्वीकारलं. यावेळी भाजप नेते शिवराज सिंह चौहान, मनोज तिवारी, हर्षवर्धन सिंह आदींसह अन्य दिग्गज नेते उपस्थित होते.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Haryanavi dancer Sapna Chaudhary joins Bharatiya Janata Party at the party’s membership drive program in Delhi.

220 people are talking about this

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी सपना चौधरी राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती, त्यानंतर ती काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. मात्र या साऱ्या अफवा असल्याचं स्पष्टीकरण सपनाने त्यावेळी दिलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button