अखेर ‘तुला पाहते रे’ मालिकेचे शुटिंग संपले, पाहा फोटो
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/tula-pahte-re.jpg)
छोट्या पडद्यावरील सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेली मालिका ‘तुला पाहते रे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. जुलै महिन्यापर्यंत ही मालिका संपणार असल्याचे खुद्द सुबोध भावेने सांगितले होते. आता मालिकेतील मायरा उर्फ अभिनेत्री अभिज्ञा भावेने मालिकेचे शुटिंग संपल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.
अभिज्ञाने तिच्या फेसबुक अकाऊंटवर मालिकेचे शुटिंग संपले असल्याचे सांगितले आहे. तिने विक्रांत सरंजामे उर्फ सुबोध भावे, गायत्री उर्फ इशा आणि मालिकेतील इतर कलाकारांसह फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करताना ‘तुला पाहते रे’च्या आठवणी कायम माझ्यासोबत असतील. आपण शेवट काय होणार याचा कधीच विचार करत नाही. अभिज्ञाचा मालिकेतील मायरा या पात्राचा प्रवास आता संपलाय असे तिने फोटो शेअर करत लिहिले.
मालिकेत सुबोधने साकारलेली विक्रांत सरंजामेची भूमिका आणि गायत्रीने साकारलेली इशा निमकरची भूमिका प्रेक्षकांना कायम लक्षात राहील. वय विसरायला लावणाऱ्या विक्रांत-इशाच्या प्रेमकहाणीने तरुणाईलाही वेड लावलं. गायत्रीने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि पदार्पणातील तिच्या या भूमिकेने खूप लोकप्रियता मिळवली. सध्या मालिकेत इशाने विक्रांतला धडा शिकवण्यासाठी त्याची सर्व माणसे तोडली आहेत. विक्रांतच्या कृत्याचा त्याला पश्चाताप व्हायला हवा असा इशाचा हेतू असतो. दरम्यान विक्रम इशावर प्रेम करु लागते. आता मालिकेचा शेवट काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.