breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

PMC Budget : पुणे महानगरपालिकेचं ९,५१५ कोटींचं बजेट

पीएमपीएलसाठी बजेटमध्ये ४७० कोटींची तरतूद

पुणे : पुणे महानगरपालिकेचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प आज दुपारी महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सादर केला आहे. नगरसेवक नसताना सादर केला गेलेला हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने पुणेकरांना या अर्थसंकल्पाची उत्सुकता होती. तब्बल ९,५१५ कोटींचं यंदाचं हे बजेट आहे. पीएमपीएलसाठी बजेटमध्ये ४७० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

या बजेटमध्ये सर्वाधिक १३०० कोटी रुपयांचा खर्च पुणे शहराच्या आणि नव्याने महापालिकेत आलेल्या गावांच्या पाणी पुरवठा व्यवस्थेसाठी खर्च करण्यात येणार आहे. तसेच यंदाच्या या बजेटमध्ये रस्ते पाणी आणि ड्रेनेज व्यवस्थेकडे महापालिकेने बारकाईने लक्ष दिले असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.

या बजेटमध्ये शहराच्या ड्रेनेज लाईन साठी आठशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच शहरांमध्ये विविध ठिकाणी सात ते आठ नवीन फ्लावर यंदा नव्याने बनवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलेली आहे.

पाणी पुरवठ्यासाठी १३२१ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. मलिनिसरणसाठी ८१२ कोटी रूपयांचा निधी ठेवला आहे. घनकचरा व्यवस्थापनसाठी ८४६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी ५९० कोटी रूपये ठेवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button