breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

७२ वर्षांचा इतिहास बदलला, प्रथमच भारताची १०० पदके निश्चित!

Asia Cup 2023 : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला आहे. १९५१ पासून खेळल्या जात असलेल्या आशियाई खेळांमध्ये प्रथमच भारताची १०० पदके निश्चित झाली आहेत.

कुस्तीपटू सोनम मलिकने महिलांच्या ६२ किलो फ्रीस्टइल स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर भारताची १०० पदके निश्चित झाली. भारताने आतापर्यंत ९५ पदके जिंकली आहेत, तर विविध स्पर्धांमध्ये आणखी किमान ६ पदके निश्चित झाली आहेत. भारताने आतापर्यंत २१ सुवर्ण, ३३ रौप्य व ३७ कांस्य अशा एकूण ९१ पदकांसह तालिकेत चौथ्या क्रमांकावर झेप घेतलीय.

या खेळांत पदक निश्चित

कम्पाऊंड तिरंदाजी : अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे यांच्यात पुरुष गटाची फायनल होणार आहे म्हणजे भारताचा सुवर्ण व रौप्यपदक निश्चित आहेच. त्याशिवाय ज्योती सुरेखा वेन्नम ही महिलांच्या वैयक्तिक फायनलमध्ये खेळणार आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : चक्रपाणी वसाहतीतील रस्त्याला अखेर ‘गती’ 

कबड्डी : भारताच्या पुरुष व महिला संघाने फायनलमध्ये प्रवेश करून भारतासाठी दोन पदकं निश्चित केली आहेत.

ब्रिज : भारताच्या पुरुष संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे आणि त्यांना जेतेपदासाठी हाँगकाँगचा सामना करायचा आहे.

पुरुष हॉकी : भारतीय पुरुष हॉकी संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि अंतिम सामन्यात आज ते जपानला भिडणार आहेत. या जेतेपदासह ते ऑलिम्पिक तिकीट पक्कं करण्यासाठी मैदानावर उतरतील.

बॅडमिंटन : सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी किमान कांस्यपदक निश्चित केलं आहे. ते उपांत्य फेरीत मलेशियन खेळाडूंविरुद्ध खेळतील.

पुरुष क्रिकेट : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघाने फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांच्यासमोर अफगाणिस्तानचे आव्हान आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button