breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

श्रीरंग बारणेंच्या संपत्तीत ५ वर्षांत ३० कोटींची वाढ, एकूण संपत्ती किती?

पिंपरी | लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला असून पुढील टप्प्यांसाठी उमेदवारांची जोरदार तयारी सुरु आहे. मावळ लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी उमेदवारांचे नामांकन अर्ज भरणे सुरु आहे. मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बारणे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती गेल्या पाच वर्षात ३० कोटींनी वाढली आहे. त्यांच्याकडे एकूण ११४ कोटींची संपत्ती आहे. मावळमधील धनाढ्य उमेदवार ठरले आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. आज दुपारी १ वाजता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारणे यांच्या प्रचारार्थ रोड शो देखील केला. दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा बारणे यांनी २ लाख मतांनी पराभव केला होता. मात्र यावेळी बारणे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचं तगडं आव्हान आहे.

हेही वाचा     –    हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आहे विशेष शुभ संयोग; अशाप्रकारे पूजा आणि उपाय केल्यास होईल फायदा 

२०१९ मध्ये श्रीरंग बारणे कुटुंबीयांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात तब्बल ८२ कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती दिली होती. आता मागील पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत ३० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये बारणे कुटुंबीयांची संपत्ती ६६ कोटी होती. २०१९ मध्ये त्यांची संपत्ती ८२ कोटी झाली. म्हणजे गेल्यावेळी त्यांच्या संपत्तीत ३५ कोटींची वाढ झाली होती. यंदा त्यांची संपत्ती ११४ कोटी दाखवण्यात आली असून गेल्या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत ३० कोटींनी वाढ झाली आहे.

श्रीरंग बारणे हे मावळमधील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. बारणे यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे अलिशान गाड्या आहेत. तसेच हिरे आणि सोन्याचे दागिनेही आहेत, तशी माहिती प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली आहे. प्रतिज्ञापत्रात दाखल माहितीनुसार श्रीरंग बारणे हे दहावी नापास आहेत. शेती, बांधकाम व्यावसायिक आणि वीट कारखानदारी आदी व्यवसाय करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button