breaking-newsआंतरराष्टीय

3 लाख सैनिक – 1 हजार विमानांसह रशियाचा मोठा युद्ध सराव

मॉस्को (रशिया) – 3 लाख सैनिक आणि 1 हजार विमानांसह रशिया मोठा युद्ध सराव करणार असल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली आहे. शीतयुद्ध कालानंतरचा, म्हणजे 1980 च्या दशकानंतरचा रशियाचा हा सर्वात मोठा युद्ध सराव असणार आहे. देशाच्या पूर्व भागात 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या काळात करण्यात येणाऱ्या या युद्ध सरावात चीन आणि मंगोलिया हे देशही भाग घेणार आहेत, असे रशियचे संरक्षण मंत्री सर्जेई शोईगू यांनी म्हटले आहे.

वोस्तोक-2018 असे या युद्ध सरावाला नाव देण्यात आले आहे. सन 1981 मध्ये पूर्व युरोपात केलेल्या जापाद-81 या युद्ध सरावासारखाच हा युद्ध सराव असला, तरी त्यापेक्षा मोठया प्रमाणावर असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वी गेल्या वर्षी बेलारुसबरोबर जापाद 2017 हा युद्ध सराव त्यांनी केला होता. या युद्ध सरावात सुमारे 12, 700 सैनिकांनी भाग घेतल्याची माहिती मॉस्कोने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button