breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

अशोक नागरी सहकारी बँकेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

  • सभेस विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

पिंपरी | महाईन्यूज । प्रतिनिधी
संत तुकारामनगर येथील अशोक नागरी सहकारी बँकेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारूप प्रसंगी सर्व महापुरुषांना व बँकेचे संस्थापक स्मृतिशेष डॉ. अशोक शिलवंत यांना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी जेष्ठ विचारवंत आदरणीय आचार्य रतनलाल सोनाग्रा हे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित सर्व संचालक व सभासदांना शुभेच्छा दिल्या. डॉ. अशोक शिलवंत यांनी सुरु केलेल्या कार्याला राजरत्न शिलवंत व सुलक्षणा शिलवंत हे चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत त्याबद्दल त्यांचे उपस्थितांनी आभार मानले.

सदर कार्यक्रम प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश बालवडकर हे उपस्थित होते. तसेच, संचालक कल्पना शिलवंत, भीमराव माने, राकेश बर्डे, कायदे सल्लागार संदीप घाटे, शिलरत्न शिलवंत, सल्लागार रमेश राजाणी आदी मान्यवर उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष अॅड राजरत्न शिलवंत यांनी सभेला उपस्थित सर्व सभासद व संचालक मंडळाचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना बँकेचे अध्यक्ष अॅड राजरत्न शिलवंत यांनी बँकेच्या नव-नवीन योजनांची माहिती दिली. तसेच सभेस उपस्थित सर्व सभासदांना बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व कामकाजाची माहिती दिली.

सभेसाठी डॉ. अमोल होलकुंडे, कारभारी टिळेकर, रामकिसन राठोड, माधव अडसुळे, प्रभाकर कोळी, अंकुश गायकवाड, प्रेमचंद उबाळे, सुभाष चवळे, हरिदास बनकर, हरिभाऊ सरदार, राजेंद्र भोसले, प्रकाश लोया, राजाभाऊ गोलांडे, सोना प्रधान, राकेश अगरवाल, शिल्पकार सुरेश राऊत, रोषण राम, विशाल कांबळे, जावेद शेख, हंसराज पालवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक अॅड राजरत्न शिलवंत यांनी केले, आभार बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुलक्षणा शिलवंत-धर यांनी मानले व सूत्रसंचालन मा. प्राध्यापक दिलीप कांबळे यांनी केले.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण गेले २३ वर्षे बँकेचे कामकाज सुरळीत पार पाडत असल्याचे सांगितले तसेच रिझर्व्ह बँकेच्या नवीन धोरणाप्रमाणे आपण आज तागायत सतत १०% लाभांश वाटप केला आहे. पुढेही लाभांश वाटपात सातत्य राखू.

  • अॅड राजरत्न शिलवंत, अध्यक्ष, अशोक नागरी सहकारी बँक.

आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण गेले २३ वर्षे बँकेचे कामकाज सुरळीत पार पाडत असल्याचे सांगितले तसेच रिझर्व्ह बँकेच्या नवीन धोरणाप्रमाणे आपण आज तागायत सतत १०% लाभांश वाटप केला आहे. पुढेही लाभांश वाटपात सातत्य राखू.

  • अॅड राजरत्न शिलवंत, अध्यक्ष, अशोक नागरी सहकारी बँक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button