Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘हनुमान अंश’ अखेर ओटीटीवर रिलीज होणार; जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल?

Hanuman Ansh OTT Release Date | यंदाच्या वर्षात बॉक्स ऑफिसवर अनपेक्षित चमत्कार घडवून आणणाऱ्या ‘हनुमान अंश’ या चित्रपटाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना भुरळ घातल्यानंतर आणि कोट्यवधींची कमाई केल्यानंतर हा चित्रपट आता ओटीटीवर (OTT) प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नीब करौरी बाबा यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा चित्रपट येत्या २७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

हा चित्रपट नेटफ्लिक्स किंवा अ‍ॅमेझॉन प्राइमवर नसून ‘सोनी लिव्ह’ (Sony LIV) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २७ नोव्हेंबरपासून स्ट्रीम केला जाणार आहे. चित्रपटाचे ओटीटी हक्क तब्बल १०० कोटी रुपयांना विकले गेल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या; मात्र निर्मात्या रागिनी सोना यांनी या चर्चा केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सोनी लिव्हसोबतचा हा करार नेमका किती कोटींना झाला, याची अधिकृत माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे.

हेही वाचा

“मध्यरात्री २ वाजता माझ्या घरावर हल्ला”; अभिषेक बॅनर्जींचा भाजपवर खळबळजनक आरोप, भाजपचे प्रत्युत्तर

विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित ‘हनुमान अंश’ ७ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता; कोणतीही तगडी स्टारकास्ट, महागडे व्हीएफएक्स किंवा भव्यदिव्य सेट्स नसतानाही, सुरुवातीला लाखोंची कमाई केल्यानंतर तिसऱ्या आठवड्यापासून वेग पकडत या चित्रपटाने ‘टॉक्सिक’सारख्या बिग बजेट चित्रपटालाही मागे टाकले, तसेच अवघ्या २ कोटींपेक्षा कमी बजेटमध्ये तयार होऊन ‘सॅकनिल्क’नुसार जगभरात तब्बल ४५२ कोटी रुपयांचे विक्रमी कलेक्शन केले असून, चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर तब्बल ३ महिन्यांनी हा ब्लॉकबस्टर चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर येत असल्याने, ज्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही, त्यांना तो आता घरबसल्या पाहता येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group