Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: बारावा आरोपी अमर मुंडिया हरियाणातून गजाआड

मुंबई | अभिनेता टायगर श्रॉफ याच्या जुहू येथील वाहनावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश आले असून, या प्रकरणातील १२ व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अमर सुरेंद्र मुंडिया असे या आरोपीचे नाव असून हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील खरखौदा येथून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. या कटात आर्थिक रसद पुरवणे आणि पैशांचे संशयास्पद व्यवहार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. विशेष मोक्का (MCOCA) न्यायालयाने अमर मुंडिया याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी खरखौदा येथे छापा टाकून मुंडियाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर स्थानिक न्यायालयाकडून तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळवून त्याला मुंबईत आणण्यात आले. शनिवारी त्याला विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांनी आरोपींच्या बँक खात्यांमधील पैशांचा मूळ स्रोत शोधण्यासाठी आणि तपासासाठी वापरलेली डिजिटल उपकरणे जप्त करण्यासाठी कोठडीची मागणी केली, जी न्यायालयाने मान्य केली.

हेही वाचा

अजित पवारांच्या निधनामुळे यंदा दिवाळी साजरी करणार नाही; शरद पवार

गुन्ह्यासाठी आर्थिक रसद पुरवल्याचा संशय; पैशांचे धागेदोरे उघड

तपासादरम्यान या प्रकरणातील संशयास्पद आर्थिक व्यवहारांची साखळी पोलिसांच्या हाती लागली असून, रोहणा येथील सहआरोपी कुणाल याने अमर मुंडिया याच्या बँक खात्यात ४० हजार रुपये ट्रान्सफर केले होते आणि त्यानंतर मुंडियाच्या खात्यातून अन्य आरोपी राधा हिच्या खात्यात १२ हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले; तसेच गोळीबारानंतर हल्लेखोरांना पळून जाण्यासाठी वापरलेली दुचाकी खरेदी करणे, लॉज किंवा हॉटेलमधील मुक्काम आणि इतर आवश्यक खर्चासाठी या निधीचा थेट वापर झाला असल्याचा पोलिसांना संशय आहे.

फरार अनिल पंडितचा शोध सुरू; बिश्नोई टोळीशी कनेक्शन

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अन्य ११ आरोपींची पोलीस कोठडीही न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा आरोप असलेला मुख्य फरार संशयित अनिल पंडित याचा शोध गुन्हे शाखा घेत आहे. गोळीबारानंतर सोशल मीडियावरून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला होता. अनिल पंडित, अटक केलेले आरोपी आणि गुन्हेगारी टोळी यांच्यातील साटेलोटे आणि हल्ल्यामागील मुख्य सूत्रधाराचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button