Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

शिक्षक व पदवीधर विधान परिषद निवडणूक। पुण्यात नामदेवराव जाधव आणि अरुणराज जाधव यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह!

सोशल मीडियावरील प्रसिद्धीला पदवीधर मतदारांचा प्रतिसाद किती? : नागपूरमध्ये नितेश कराळे, मराठवाड्यात रविराज साबळे यांना लक्षणीय मते; पुण्यात मात्र चर्चेतील उमेदवारांचा नगण्य प्रभाव

पुणे । विशेष प्रतिनिधी : सोशल मीडियावरील प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष निवडणुकीतील मतदारांचा पाठिंबा या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. नागपूरमध्ये नितेश कराळे आणि मराठवाड्यात रविराज साबळे पाटील यांना हजारोंच्या संख्येने मते मिळाली. त्या तुलनेत पुण्यात प्रा. नामदेवराव जाधव, अरुणराज जाधव यांना मिळालेला प्रतिसाद मर्यादित नव्हे नगण्य राहिला.

नागपूरमध्ये नितेश कराळे यांना २४,२४९, तर मराठवाड्यात रविराज साबळे पाटील यांना १९,८३५ मते मिळाली आहे. पुण्यात नामदेवराव जाधव यांना २,०८९ मते मिळाल्याची नोंद आहे. तर अरुणराज जाधव यांची अंतिम मतसंख्या अत्यंत कमी आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव आणि भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांच्यात मुख्य लढत झाली. या तुलनेत नामदेवराव जाधव यांना मिळालेली मते अत्यल्प राहिली. त्यामुळे सोशल मीडियावरील सक्रियता आणि प्रत्यक्ष निवडणुकीतील संघटनात्मक पाठिंबा यांच्यातील अंतर स्पष्ट होते.

पदवीधर मतदारांनी कोणत्या मुद्द्यांना महत्त्व दिले?

पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत केवळ प्रसिद्धीपेक्षा उमेदवारांचा प्रत्यक्ष संपर्क, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य, मतदार नोंदणी, संघटनात्मक तयारी आणि स्थानिक प्रश्नांवरील भूमिका महत्त्वाच्या ठरू शकतात. नितेश कराळे आणि रविराज साबळे यांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत नामदेवराव जाधव यांची कामगिरी मर्यादित राहिल्याने पुण्यातील सोशल मीडिया-केंद्रित प्रचाराच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित होतात.

महापौर रवी लांडगे यांच्याशी राजकीय जवळीक; पण निवडणुकीत स्वतंत्र जनाधाराचा प्रश्न!

पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या राजकीय वर्तुळात वावरणारे प्रा. नामदेवराव जाधव आणि अरुणराज जाधव यांच्या निवडणूक कामगिरीकडेही लक्ष वेधले जात आहे. राजकीय नेत्यांसोबतची उपस्थिती, सार्वजनिक कार्यक्रमांमधील सहभाग आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धी यांचे प्रत्यक्ष मतांमध्ये कितपत रूपांतर होते, हा प्रश्न या निवडणुकीच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे. लोकशाहीत प्रसिद्धीची परीक्षा मतपेटीत होते; राजकीय वजनाचा दावा करण्यापेक्षा मतदारांचा विश्वास संपादन करणे अधिक महत्त्वाचे असते. पुणे-पिंपरी चिंचवड करांना आणि सर्वसामान्य नागरिकांना रोज उपदेशाचे डोस देणाऱ्या या दोन्ही पॉलिटिकल सोशल इम्प्लिअन्सरनी स्वतःच्या कामगिरीचे आणि भूमिकेचे आत्मचिंतन करावे अशी चर्चा आता प्रसारमाध्यम आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button