‘एसजेपीएल’ सोनिगरा ज्वेलर्सच्या ‘गौरव स्त्रीशक्तीचा’ सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!
दिवाळीनिमित्त नवीन दागिन्यांच्या कलेक्शनने महिलांना घातली भुरळ; फेस्टिव्हल ऑफर्सचा घेतला लाभ

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
दिवाळी सणाचे औचित्य साधून चिंचवड येथील एसजेपीएल (SJPL) सोनिगरा ज्वेलर्सच्या वतीने आयोजित ‘गौरव स्त्रीशक्तीचा’ या विशेष सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान आणि त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात दिवाळीनिमित्त सादर करण्यात आलेल्या नवीन दागिन्यांच्या आकर्षक कलेक्शनने उपस्थित महिलांना भुरळ घातली. यावेळी महिलांनी फेस्टिव्हल ऑफर्सचा लाभ घेत खरेदीचा आनंदही लुटला.
चिंचवड येथील एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्सच्या दालनात शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रमेश सोनिगरा यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सहभाग लाभला. सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रांतील महिलांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
नवीन दागिन्यांचे कलेक्शन ठरले आकर्षणाचे केंद्र
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोनिगरा ज्वेलर्सच्या वतीने सादर करण्यात आलेले नवीन दागिन्यांचे कलेक्शन कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देणाऱ्या आकर्षक डिझाइन्स, कलात्मक दागिने आणि वैविध्यपूर्ण कलेक्शनने उपस्थित महिलांचे लक्ष वेधून घेतले. सणासुदीच्या काळात आपल्या आवडीचे दागिने निवडण्यासाठी महिलांनी विशेष उत्सुकता दाखवली. दिवाळीनिमित्त उपलब्ध करून देण्यात आलेल्या फेस्टिव्हल ऑफर्सनाही चांगला प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा – शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास फायनान्स कंपन्यांवर कारवाई; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा इशारा
विविध क्षेत्रांतील मान्यवर महिलांचा सन्मान…
या सोहळ्यात एक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेसच्या संचालिका मनीषा थोरात-पिसाळ, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेविका सुलभा उबाळे, डॉ.भाग्यश्री लहाने मुंडे, उद्योजिका राजश्री गागरे, उद्योजिका प्रीती बोंडे, उद्योजिका इंद्रायणी काळकुटे, डॉ. प्रेरणा गोपाळे, डॉ. ज्योती काळे, डॉ. पूनम कराळे, डॉ. स्वाती पवार, डॉ. तेजस्वी पुजारी, लिओज फिटनेस क्लबच्या स्नेहा वैरागडे, डॉ. अश्विनी माटे, डॉ. यामिनी सदाबहार, डॉ. प्रगती सरडे, संगीता शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्सच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले.
स्त्रीशक्तीच्या सन्मानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
कुटुंबाच्या जडणघडणीपासून समाजाच्या प्रगतीपर्यंत महिलांचे योगदान अनमोल आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना एकत्र आणून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या आनंदोत्सवाला स्त्रीशक्तीच्या सन्मानाची जोड देत एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्सने सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. मान्यवर महिलांचा सहभाग, नवीन दागिन्यांचे आकर्षक कलेक्शन आणि सणासुदीच्या विशेष ऑफर्समुळे हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“स्त्री ही प्रत्येक कुटुंबाची खरी शक्ती आणि समाजाच्या प्रगतीचा भक्कम आधार आहे. घर, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाने नवनवे आदर्श निर्माण करत आहेत. अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. दागिने हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून महिलांच्या जिव्हाळ्याच्या भावना, परंपरा आणि विश्वासाशी जोडलेले असतात. एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्सने गेल्या सात दशकांहून अधिक काळ जपलेला ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी संपत्ती आहे. ‘गौरव स्त्रीशक्तीचा’ या उपक्रमातून महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या सोहळ्याला महिलांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.”
— राहुल रमेश सोनिगरा, व्यवस्थापकीय संचालक, एसजेपीएल सोनिगरा ज्वेलर्स




