Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

तिलक वर्माचा झंझावात! भारताचा न्यूझीलंडवर थरारक विजय, मालिकेत २-० ने आघाडी

IND vs NZ | अवघ्या ७० धावांवर ५ आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतरही उपकर्णधार तिलक वर्माच्या धडाकेबाज नाबाद अर्धशतकाच्या आणि अखेरच्या क्षणी नितीश रेड्डीने दिलेल्या संयमी साथीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ४ गडी राखून थरारक विजय नोंदवला. अखेरच्या षटकात रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारताने १ चेंडू राखून १८१ धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी भक्कम आघाडी घेतली.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघासमोर न्यूझीलंडने दमदार फलंदाजी करत १८० धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. टॉप-५ फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने संघ अडचणीत सापडला. फिनिशरच्या भूमिकेत आलेल्या नमन धीरने ३१ धावांची उपयुक्त खेळी करून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला; मात्र कर्णधार मिचेल सँटनरने त्याला बाद करत भारताला मोठा धक्का दिला.

हेही वाचा

स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांतील संधींचा शोध घ्या; संतोष खैरनार

तिलक वर्माचे वादळी अर्धशतक

७० धावांवर निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर उपकर्णधार तिलक वर्माने जबाबदारीने खेळत सामन्याचे चित्र पालटले. अखेरच्या षटकांमध्ये त्याला हैदराबादच्याच नितीश रेड्डीची उत्तम साथ लाभली. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ११ धावांची आवश्यकता असताना, नितीश रेड्डीने पहिल्या चेंडूवर धाव घेत तिलकला स्ट्राईक दिली. तिलकने दुसऱ्या चेंडूवर दणदणीत चौकार लगावला आणि तिसऱ्या चेंडूवर दोन धावा काढत अवघ्या २६ चेंडूंत आपले शानदार अर्धशतक पूर्ण केले. चौथ्या चेंडूवर तिलकने एक धाव काढल्यानंतर डफीने टाकलेला पुढचा चेंडू वाईड ठरला. त्यानंतर भारताने आवश्यक २ धावा पूर्ण करत न्यूझीलंडच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button