Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

सीएसएमटी स्थानकात तिकीट खिडकीजवळ छताचा भाग कोसळला; दोन प्रवासी जखमी

मुंबई | मध्य रेल्वेवरील अत्यंत गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकात गुरुवारी रात्री एक दुर्घटना घडली. स्थानकातील तिकीट खिडकीच्या प्रवेशद्वाराजवळ छताचा काही भाग अचानक कोसळल्याने दोन प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात छताचा भाग कोसळला, तिथे रेल्वे भूमी विकास प्राधिकरणाचे (RLDA) काम सुरू होते. या दुर्घटनेत विनायक बाळू हटकर (वय २८, रा. घाटकोपर) आणि अयान नौशाद मातवणकर (वय २४, रा. सँडहर्स्ट रोड) हे दोन प्रवासी जखमी झाले. हटकर यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला दुखापत झाल्याने टाके घालण्यात आले आहेत. तर मातवणकर यांच्या डोळ्याच्या वरच्या पापणीला, मानेवर व खांद्यावर जखमा झाल्या असून त्यांच्या घोट्याला सूज आली आहे. दोघांवरही सेंट जॉर्ज रुग्णालयातील अपघात विभागात उपचार सुरू असून वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.

हेही वाचा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! दिवाळीपूर्वी खात्यात जमा होणार ₹५,०००; कृषिमंत्र्यांनी सांगितली मुदत

सीएसएमटी हे मुंबईतील मुख्य आणि २४ तास वर्दळ असणारे रेल्वे स्थानक आहे. अशा ठिकाणी थेट तिकीट घराच्या प्रवेशद्वाराजवळच छताचा भाग कोसळल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आरएलडीएकडून काम सुरू असताना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती का, असा सवाल आता विचारला जात आहे. छताचा भाग नेमका कोणत्या कारणाने कोसळला, याबाबतचे अधिकृत कारण अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट झालेले नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button